आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासम्मेद शिखर्जीला पर्यटन स्थळ घोषित केल्याने जैन समाजाने पुकारलेल्या अंबड बंदला प्रतिसाद मिळाला. यावेळी समाजबांधवासह इतरांनी सहभागी नोंदवत तहसीलवर मोर्चा काढला.हा मोर्चा १००८ भगवान महावीर मंदिरापासून सुरू होऊन महाराष्ट्र द्वार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक मार्गे, तहसील कार्यालय येथे पोहोचला. हा मोर्चा १००८ भगवान महावीर मंदिरापासून सुरू होऊन महाराष्ट्र द्वार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक मार्गे, तहसील कार्यालय येथे पोहोचला.
यावेळी तहसीलदार गौरव खैरनार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, सदरील तीर्थस्थळास पर्यटनाचा दर्जा देऊन या ठिकाणी व्यापारी संकलन उभे केले जाण्याचे षडयंत्र असल्याने जैन समाजाचा याला तीव्र विरोध आहे. सदरील निर्णय परत घेण्यात यावा या मागणीसाठी सकल जैन समाजाने अहिंसक पद्धतीने आज बंद पुकारून विरोध दर्शविला आहे.
सकल जैन समाजाचे धार्मिक भावना लक्षात ठेवून महाराष्ट्र सरकारने केंद्र व झारखंड सरकार पर्यटन स्थळाबाबतचा घेतलेला निर्णय रद्द करण्याबाबत उद्बोधित करावे, अशी मागणी केली. यावेळी तालुक्यातील सकल जैन जैन बांधवासह इतर सर्व समाजानेही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.