आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक स्नेहसंमेलन:जालना पब्लिक स्कूलच्या‎ स्नेहसंमेलनास प्रतिसाद‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील इंदेवाडी येथील‎ जालना पब्लिक स्कुलमध्ये‎ मंगळवारी वार्षिक स्नेहसंमेलनात‎ विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचे‎ सादरीकरण करुन उपस्थितांचे मन‎ जिंकले.‎ कार्यक्रमाचे उद्घाटन माजी‎ राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या‎ हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी‎ संस्थेचे सचिव बाबुराव गावंडे तर‎ प्रमुख पाहुणे म्हणुन‎ गटशिक्षणाधिकारी आसावरी काळे,‎ नायब तहसिलदार दिलीप सोनवणे,‎ शिवसेना उपशहरप्रमुख दिनेश‎ भगत, प्राचार्य रोहन यादव, सर्जेराव‎ शिंदे, संजय जैस्वाल, किशोर‎ चव्हाण, सुमित वाघमारे यांची‎ उपस्थिती होती.

कार्यक्रमात‎ विद्यार्थ्यांच्या एकापेक्षा एक सरस‎ कलाविष्कारांनी प्रेक्षकांची वाहवा‎ मिळवली. //"मर्द मावळा.. या गिताने‎ प्रेक्षकांमध्ये रोमांच उभा केला ,‎ वैभवी नेटके या विद्यार्थीनीने‎ डोळयावर पट्टी बांधुन नृत्य सादर‎ केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना रोख‎ स्वरुपात बक्षीस देऊन प्रोत्साहित‎ केले. सुत्रसंचालन नेहा राठोड,‎ सविता इंगळे यांनी तर प्राचार्या किर्ती‎ पवार यांनी आभार मानले.‎ कार्यक्रमासाठी वैशाली यन्नावार,‎ सोनल राऊत, स्नेहल बोंदरवाल,‎ किरण लोखंडे, रेवती माने, प्रतीक्षा‎ देशपांडे, योगिता गिरी, मंजुषा दळवी‎ आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...