आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळा:सिद्धार्थ महाविद्यालयात इंडो-जर्मन टूल रूमतर्फे प्रशिक्षण कार्यशाळेस प्रतिसाद

जाफराबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिद्धार्थ महाविद्यालयात इंडो-जर्मन टूलरूम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्राचार्य, डॉ. श्याम सर्जे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. राहुल म्हस्के, पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, प्रा. डॉ. कैलास पाटील यांची उपस्थिती होती.

प्रा. राहुल म्हस्के यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कौशल्याधारीत अभ्यासक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक रमेश जायभाये यांनी महिला विषयक कायदे आणि वाहतूक नियम या विषयावर आपले विचार मांडून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. किशोर वयात विद्यार्थ्यांनी योग्य भूमिका घेऊन उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून रोजगार निर्मिती करावी असे मत व्यक्त केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मनोज ठाकरे यांनी इतिहास व त्या माध्यमातून चालणारे प्रशिक्षण व त्यातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले. एस. बी. ननावरे यांनी कौशल्य आधारित प्रशिक्षणाची गरज यावर विचार मांडले. अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे व प्रा. डॉ. कैलास पाटील यांनी भुषविले. प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सुनंदा सोनुने, प्रा. डॉ. शिवाजी जगतवाड यांनी तर प्रा. सोपान एरंडे यांनी आभार मानले. यावेळी अनिल म्हस्के, अनिल राकेवार, विनोद हिवराळे, जया निकम, मेघा नागमोडे यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...