आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:आज 2 वाजेपर्यंत लागतील सर्व ग्रामपंचायतींचे निकाल

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ८२९ केंद्रांवर रविवारी झालेल्या मतदानाची मोजणी मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच निकाल हाती येणार आहेत. यामुळे गावच्या सरपंच व सदस्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ५१ हजार ९९२ मतदार होते. त्यापैकी २ लाख ९९ हजार २३९ मतदारांनी आपला हक्क बजावला.

यात १ लाख ४० हजार ८३७ स्त्री, १ लाख ५८ हजार ४०१ पुरुष तर एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत एकूण ८५.०१ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक ८७.३८ टक्के मतदान भोकरदन तालुक्यात तर सर्वात कमी ८३.५० टक्के मतदान जालना तालुक्यात झाले. दरम्यान, या मतांची मोजणी करण्यासाठी संबंधित तहसील स्तरावरून पूर्वतयारी करण्यात आली असून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच निकाल पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

तालुक्याचे नाव, ग्रामपंचायतींची संख्या व मतमोजणीचे प्रस्तावित ठिकाण असे : जालना (२९) तहसील कार्यालय, भोकरदन (३०) नगर परिषद मंगल कार्यालय, जाफराबाद (५३) तहसील कार्यालय, परतूर (३९) जवाहर नवोदय विद्यालय, आंबा ता. परतूर. मंठा (३१) तहसील कार्यालय, घनसावंगी (३३) मुख्य इमारत, सीईओ हॉल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंबड (३९) तहसील कार्यालय अशी ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्या-त्या ठिकाणी मतमोजणी टेबल व अधिकारी-कर्मचारी नेमले आहेत.

बातम्या आणखी आहेत...