आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेणुकाई भोकरदन तालुक्यातील वरुड बु. येथील विनोद दामोदर लोखंडे हे भारतीय सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले. गावातील सैनिक देश सेवा करुन आपल्या मूळ गावी परतत असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एक आगळ्यावेगळ्या सत्काराचे आयोजन गावात करीत पती व पत्नीचे यांचा ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या जल्लोष करून मिरवणूक काढली. यावेळी महिलांनी घरासमोर सडा रांगोळी टाकून विनोद लोखंडे यांचे औक्षण केले. ग्रामस्थांकडून होत असलेला आगळावेगळा सत्कार पाहून विनोद लोखंडे ना गहिवरून आले.
विनोद लोखंडे हे भारतीय सैनिक सेवेत सलग २२ वर्ष काम करीत असताना त्यांनी गावात देखील सामाजिक सलोखा जोपासत सामाजिक कार्यात नेहमी हातभार लावलेला आहे. आजवर जम्मू-काश्मीर, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. त्यांचा नोकरीचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांना भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त करण्यात आले. गुरुवारी सकाळी लोखंडे हे आपल्या मूळ गावी वरुड बु. येथे आले असता ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी गावातील माजी सैनिक दामोदर लोंखडे ग्रामसेवक उंबरकर, साडु वाघ, विष्णू बावस्कर, बालु वाघ, संदीप वाघ, रवींद्र लोखंडे, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर सोनवणे, विश्वासराव साळवे, शिवाजी वाघ, मनोहर धनराज, हबीब शेठ, रवींद्र वाघ, नारायण बावस्कर, अशोक वाघ, भगवान पालकर, अनिल वाघ, प्रदीप वाघ, माधव वाघ, आत्माराम वाघ, गणेश वाघ, योगेश वाघ, मोठेबा वाघ, रामकृष्ण वाघ, सोनाजी बावस्कर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.