आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुठल्याही सेवेत काम करीत असताना प्रत्येकाला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती घ्यावी लागते. परंतु सेवानिवृत्ती म्हणजे थांबणे नसून आयुष्याचे एक वळण आहे. या वळणावर जरा विसावून पुन्हा नवीन इनिंग सुरू करता येते, असे प्रतिपादन प्राचार्य सचिन राठोड यांनी केले.
येथील रेणुका माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी ज्येष्ठ शिक्षक सुभाष काळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर. के. राठोड, प्रा.सोनाजी कामिटे, परिवेक्षक डी.एस. बुलबुले, संगीता काळे, प्रा.अशोक चव्हाण आदींची उपस्थिती होती. विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक सुभाष काळे आणि त्यांच्या पत्नी संगीता काळे यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य राठोड म्हणाले, आपण सेवाकाळात कमावलेली माणसे हीच आपल्याला सेवानिवृत्तीनंतर कामी पडतात. ज्या सहकाऱ्यांसोबत दीर्घकाळ काम केले, त्यांना सोडून जाताना मनाचा हळवा कोपरा नक्कीच भावुक होतो. परंतु सेवानिवृत्ती म्हणजे थांबणे नसून, एका वळणावर थोडे विसावून पुन्हा नव्या इनिंगची सुरुवात असते.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर. के. राठोड, प्रा एस.पी. गोर्डे, प्रविण वाकोडकर, प्रा.साधना जुंबड यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ शिक्षक सुभाष काळे म्हणाले, मुलांमध्ये रममाण होताना आयुष्यातील दुःख देखील हलकी वाटायची. सर्व सहकाऱ्यांबाबतची कृतज्ञता त्यांनी बोलून दाखवली. स्टाफ रूममधील अनेक अविस्मरणीय किस्से सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप देशमुख यांनी तर अशोक गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी सुधाकर शिंदे, एस.पी.राठोड, सुजाता शिंदे, ए.जी.राठोड, स्वप्नील राठोड आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.