आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यातील 39 बारवांचे होणार पुनरुज्जीवन,‎ जलसंधारण व नगर परिषदेकडून सर्वेक्षण‎

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना‎ प्राचीन व ऐतिहासिक वारसा निर्माण‎ करणाऱ्या जिल्ह्यातील ३८ बारवांचे‎ पुनरुज्जीवन अर्थात संवर्धन करण्यात‎ येणार असून यासाठी जलसंधारण व‎ नगरपालिकांकडून सर्वेक्षण केले जात‎ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी‎ होळकर यांनी निर्माण केलेल्या तसेच‎ यादवकालीन, शिवकालीन बारवांचा‎ यात समावेश आहे.‎ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ‎ ‎ यासाठी महसूल, जलसंधारण आणि‎ नगर परिषद यंत्रणेसह बारव संवर्धन ‎ ‎ करणाऱ्या टीमला सक्रिय केले आहे. ‎ ‎ जलसंधारण तसेच नगर परिषदेच्या‎ वतीने बारवांच्या सद्य:स्थितीवरून‎ बारव पूर्वस्वरूपात करावयाच्या‎ उपाययोजनाकरिता वास्तुविशारद‎ यांची मदत घेण्यात येणार आहे. या‎ बारवा गाळमुक्त करून त्याची‎ डागडुजी करण्याबरोबरच परिसरात‎ पेव्हर ब्लॉक बसवून कंपाउंड करण्यात‎ येणार आहे. जिल्ह्यातील ३८‎ बारवांमध्ये अंबड येथील महाद्वारी,‎ पुष्कर्णी, कावंदी, राणी, होळकर, शंभू‎ महादेव मंदिर, दुल्हन, तांबोळी‎ मळ्यासह, मत्स्योदरी देवी मंदिरातील‎ बारवांचा समावेश आहे. भोकरदन‎ तालुक्यातील जानेफळ दाभाडी,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ लोनगाव, पिंपळगाव रेणुकाई, सावंगी‎ अवघडराव, सुरंगळी, वालसावंगी,‎ घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव, देवी‎ दहेगाव, तीर्थपुरी, मुरमा, पारडगाव,‎ जालना तालुक्यातील इंदेवाडी,‎ नागापूर, नेर, वाघ्रुळ, जालना‎ शहरातील अमृतेश्वर महादेव मंदिर,‎ भैरवनाथ मंदिर, ढवळेश्वर मंदिर,‎ इंदिरानगर, महादेव मंदिर, रेणुका मंदिर,‎ लक्कडकोट पुलाशेजारील बारव, मंठा‎ तालुक्यातील नेर, हेलस, केंधळी,‎ विडोळी, परतूर शहरातील महादेव‎ मंदिर, मावपाटोदा येथील गणपती‎ बारवांचा समावेश केलेला आहे. या‎ बारव संवर्धनातून पाण्याचा प्रश्न‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ मिटणार आहे. त्याचबरोबर पर्यटनाला‎ चालना मिळून पर्यटक, अभ्यासक‎ बारवांच्या अभ्यासासाठी जिल्ह्यातील‎ ऐतिहासिक वारसा स्थळांसह बारवांना‎ भेटी देतील.‎ बारवा जतन करण्यासाठी‎ पुढाकार‎ जिल्ह्यात नंदा, भद्रा, जया, विजया या‎ स्थापत्य शैलीच्या सुंदर बारवा असून‎ पूर्वी बारवांची संख्या दीडशेच्या‎ जवळपास होती. मात्र सध्या अवशेष‎ स्वरूपात ५० बारवा पाहायला‎ मिळतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी‎ वाटसरू, तीर्थयात्रा करणारे, व्यापारी,‎ लष्करी सैन्यासाठी जिल्ह्यातून‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ पंढरपूरकडे गेलेल्या मार्गावर बारवा‎ निर्माण केलेल्या आहेत. स्थानिक‎ परिसरात मिळणाऱ्या दगड विटांचा‎ वापर करून बारवा निर्माण केलेल्या‎ आहेत तर पूर्वीच्या बारवांचा त्यांनी‎ जीर्णोद्धार केलेला आहे. महाराष्ट्र‎ बारव मोहीम व वारसा संवर्धन‎ समितीच्या माध्यमातून या बारवा जतन‎ करण्यासाठी पुढाकार घेतलेला असून‎ जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी‎ हाती घेतलेल्या बारव जतन व संवर्धन‎ मोहिमेत देखील आम्ही योगदान देऊ,‎ अशी माहिती महाराष्ट्र बारव मोहीमचे‎ समन्वयक रामभाऊ लांडे यांनी दिली.‎ जलसंधारण आणि नगर परिषद यंत्रणेसह बारव संवर्धन टीमचा पुढाकार‎ देखभाल } यादवकालीन, शिवकालीन, होळकरकालीन ३८ बारवांचा समावेश‎ अंबड येथील पुष्करणी बारव आणि महाद्वारीचे संवर्धन करण्यात येणार आहे.‎ बारव संवर्धनास प्रारंभ‎ अंबड शहरातील आठ बारवा संवर्धन‎ करण्यासाठी जालना जिल्हाधिकारी यांचे‎ आदेश असून शहराची ऐतिहासिक‎ ओळख व वारसा जतन करण्याकरिता‎ प्रशासकीय स्तरावर उपाययोजना सुरू‎ आहेत. यासाठी तहसीलदार यांचेसह‎ महाद्वारी व इतर बारवांची पाहणी करून‎ तेथील वाढलेल्या सुबाभळी काढून बारव‎ संवर्धनाला सुरुवात केली आहे, अशी‎ प्रतिक्रिया अंबड न.प.चे मुख्याधिकारी‎ विक्रम मांडुरके यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...