आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:प्रामाणिकपणाबद्दल विद्यार्थ्यास बक्षीस

वाटूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दोन विद्यार्थ्यांना रस्त्यात किमती मोबाइल आणि रोख रक्कम सापडली असता त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत पोलिस चौकीत नेऊन दिला. याबद्दल कौतुक होत आहे.

बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा ही शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी अनिकेत पजई, करण राऊत हे घरी जात असताना विद्यार्थ्यांच्या नजरेत रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाइलवर पडली. त्यांनी मोबाइल न उचलता विद्यार्थ्यासोबत चालत असणारे सिरसाट, काळे या शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी त्यांना मोबाइल घेऊन येण्यास सांगितले. व मोबाइल शिक्षकांनी पाहिला असता तो पाण्याने भिजलेला होता. मोबाइल अँड्रॉइड आणि महागडा होता.

त्या मोबाइलचा कव्हरमध्ये रोख रक्कम १५०० होती. यावेळी मुख्याध्यापक व्हि. व्हि. खरात यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर तोमोबाईल वाटूर पोलिस चौकीतील कॉन्स्टेबल राम पालवे यांच्याकडे देण्यात आला. पालवे यांनी मुलांची इमानदारी पाहता बक्षीस देत सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक खरात, रवी जयस्वाल, सचिन वाघमारे आदींची उपस्थिती होती.