आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंस्कार कथा व्यक्तीचे आयुष्य घडवत असतात, असे प्रातिपादन, डॉ. व्ही. के. कोठेकर यांनी केले.सेल येथील दुर्गाताई कुलकर्णी यांचा पाचवा स्मृतिदिन व ला. रा. नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त आयोजित आंतरशालेय कथाकथन स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, परिक्षक मधुकर काष्टे, कल्पना हेलसकर यांची उपस्थिती होती. दुर्गाताई यांनी सेलू कथामाले चे रोपटे लावले व त्या रोपट्या द्वारे आज सेलूत नव्हे मराठवाड्यात अनेक संस्कारक्षम पिढ्या घडल्या आहेत. कारण संस्कार कथा व्यक्तीच आयुष्य घडवतात, असे डॉ. कोठेकर म्हणाले. या स्पर्धेत सेलू शहरातील २१ शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. परीक्षक म्हणून मधुकर काष्टे, अनघा वैद्य यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन श्रीकांत नेवरेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील अनिल रत्नपारखी, भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण, सीमा सुकते, सुरेखा रामदासी, रेणुका अंबेकर, अनंता बोराडे, बालाजी देऊळगावकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.