आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न‎ मिटला:रस्ता डांबरीकरणाचे‎ काम पूर्णत्वाकडे‎

शेलूद‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलूद ते‎ धावडा या नऊ किलोमीटर रस्त्याचे‎ डाबंरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे‎ जात असून यामुळे परिसरातील‎ नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न‎ मिटला आहे.‎ हा रस्ता खांदेश,विदर्भाला‎ अजिंठा ते बुलढाणा महामार्ग‎ धावडा ते गोद्री खांदेशाला जोडला‎ जाणारा असल्याने वाहनांची सतत‎ वर्दळ असते. मात्र या रस्त्याची‎ दुरावस्था झाल्याने वाहनधारकांना‎ या रस्त्यावरून वाहन चालवताना‎ तारेवरची कसरत करावी लागत‎ होती. शेलूद ते धावडा हा रस्ता‎ विदर्भ व खान्देशाला जोडल्या‎ जाणारा राज्यमार्ग आहे. अनेक‎ वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट‎ अवस्थेत पडून होते परंतु खांदेशात‎ कुंभमेळा झाल्याने तत्काळ या‎ रस्त्याचे काम करण्यात आले.‎

शेलूद व धावडा हे तालुक्यातील‎ मोठी लोकसंख्या असलेली गावे‎ आहे. शिवाय तालुक्यातील सर्वात‎ मोठी बाजारपेठ म्हणून‎ वालसावंगीकडे पाहिल्या जाते. या‎ गावाशी परिसरातील अनेक गावाचा‎ संपर्क येत असतो. त्यामुळे‎ नागरिकांची मोठी ये-जा या‎ रस्त्यावर असते. खराब रस्त्यामुळे‎ नऊ किलोमीटर रस्त्याचे अंतर‎ कापण्यासाठी पंचवीस मिनीटाचा‎ कालावधी लागत असत. दरम्यान‎ या रस्त्यावरून बारहेगावी खासगी‎ वाहन करुन जायचे झाल्यास‎ वाहनचालक देखील रस्ता खराब‎ असल्याचे कारण देत जास्तीचे भाडे‎ आकारत असल्याने याचा नाहक‎ भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसत‎ होता. या रस्त्यावरून जाळीचा देव,‎ कालीका देवी, पद्मावतीचे वाल्मिकी‎ महाराज आदी धार्मिक ठिकाणी‎ जावे लागत आसल्याने यात्रेच्या‎ काळात बाहेरुन येणाऱ्या‎ वाहनधारकांना मोठा त्रास सहन‎ करावा लागत असत.‎

बातम्या आणखी आहेत...