आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता:आधुनिक मशिनरीमुळे 15 दिवसांतच रस्ता

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या विविध योजनांतर्गत सिमेंट रस्त्यासाठी आधुनिक मशिनरीचा वापर केला जात आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर हायजॅक, सिमेंट, खडी मिक्स करणाऱ्या मशिनरींमुळे अवघ्या पंधरा ते वीस दिवसांतच रस्ते तयार होत आहेत. या कामासाठी नागरिक स्वत: आपल्या प्रभागातील कामांस सहकार्य करीत असल्याने शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांच्या कामाला वेग आला आहे.

शहरातील विविध भागांत रस्ते खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते उखडल्याने नागरिकांची गैरसोयही होत आहे. माजी नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी वॉर्डातील संजयनगर व मंदिराकडे येणारा रस्ता अवघ्या पंधरा दिवसांत तयार केला आहे. यासह इतर भागांत अजूनही रस्त्यांची कामे सुरू आहेत. बडी सडक, कन्हैयानगर या मार्गावर काम सुरू न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या काही भागांत सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते तयार होत असताना संजयनगरप्रमाणे त्या-त्या भागातील नागरिक सहकार्य करत असल्याने कामे तत्काळ होण्यास मदत होत आहे.

सर्वांच्या सहकार्याने काम मार्गी लागले
रस्ता तयार करीत असतानाच नगराध्यक्षा, मुख्याधिकारी मदत करत आहेत. सजग नागरिकांनीही काम तत्काळ व्हावे या उद्देशाने रस्ता बंद करून काम मार्गी लागण्यास मदत केली. सर्वांच्या सहकार्याने ही कामे पूर्ण झाली.-ज्ञानेश्वर ढोबळे, माजी नगरसेवक, संजयनगर

दर्जेदार कामे करण्यावर भर
शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. कंत्राटदारांकडून नवीन मशिनरीचा वापर होत असल्यामुळे तत्काळ रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत हाेत आहे. संतोष खांडेकर, मुख्याधिकारी

सदर बाजार भागातील काम रखडलेलेच
शहरातील सदर बाजार ठाण्यासमोरून जाणाऱ्या रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम केले जाणार आहे. या अनुषंगाने अनेक दिवसांपासून रस्ता खोदून ठेवला आहे. परंतु, अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे या भागातून जाणारे वाहनचालक, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...