आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यामुळे त्रस्त‎:माली पिंपळगाव येथील‎ रस्त्याच्या कामाला प्रारंभ‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित‎ असलेल्या जालना तालुक्यातील‎ हिस्वन- माली पिंपळगाव रस्त्याच्या‎ कामाला अखेर प्रत्यक्षात सुरुवात‎ करण्यात आली आहे. या रस्त्याच्या‎ कामासाठी माली पिंपळगावचे‎ सरपंच सतीश पाटेकर यांनी‎ आमदार राजेश टोपे यांच्याकडे‎ पाठपुरावा केला होता. त्याला यश‎ आले असून कामाला सुरूवात‎ करण्यात आली आहे.‎

अनेक वर्षांपासून माली पिंपळगाव‎ येथील ग्रामस्थ या रस्त्यामुळे त्रस्त‎ होते. माली पिंपळगावचे‎ नवनिर्वाचित सरपंच सतीश पाटेकर‎ यांनी ही बाब माजी मंत्री आमदार‎ राजेश टोपे यांच्याकडे मांडली व या‎ गोष्टीचा वारंवार पाठपुरावा केला.‎ याची दखल घेत आमदार राजेश‎ टोपे यांनी संबंधित विभागातील‎ अधिकाऱ्यांना चांगले खडसावले व‎ रस्त्याचे काम तत्काळ सुरू‎ करण्याच्या सूचना केल्या.

आमदार‎ राजेश टोपे यांच्यामुळे सदरील‎ रस्त्याच्या कामास सुरुवात झाली‎ असल्याचे सरपंच सतीश पाटेकर‎ यांनी सांगितले. या कामाचा शुभारंभ‎ प्रसंगी सरपंच सतीश पाटेकर,‎ उपसरपंच ज्ञानेश्वर थोरात,‎ ग्रामपंचायत सदस्य अस्लम सय्यद,‎ मुरलीधर पिसोरे, लक्ष्मण पिसोरे,‎ दत्ता शिंगाडे, शहादेव कवडे,‎ युवराज पाटेकर, रमेश शेळके,‎ शुभास शेळके आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...