आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपणास न्याय न मिळाल्याने आयजी कार्यालयासमोर २७ जून रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा चिखली येथील रोहिणी पाटील यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे माझ्या पतीला १५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे त्याचबरोबर एक लाख साडेसोळा हजार रुपयांची, काढून फसवणूक करून गुंगीचे औषध देऊन पळ काढला आहे त्याचबरोबर 15 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास गोळ्या झाडू अशी धमकी देण्यात आली आहे.
अशी आशयाची तक्रार बदनापूर पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे करुनही प्रशासनाने कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे आपण आयजी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.