आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:जालना रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी रोटरी रेनबोतर्फे थंड पाण्याची सोय

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोच्यावतीने प्रवाशांच्या सेवेसाठी जालना रेल्वे स्थानकावर श्रीमती सावित्रिदेवी कचरुलाल राठी यांच्या स्मरणार्थ थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, वॉटर कुलरचे लोकार्पण सोमवारी ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रेनबोचे अध्यक्ष संजय राठी, सुरेश साबू, उपप्रांतपाल सुमित्रा गादिया, प्रकल्पप्रमुख गोविंद राम मंत्री, गोपाल मुंदड़ा, महेश माली, कैलास बियानी, संजय रुईखेडकर, पौर्णिमा रुइखेडकर, भारती आदी उपस्थित होते. मोतीपवळे यांनी रोटरी रेनबो राबवित असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून जनतेच्या गरजा ओळखून या दृष्टीने उपक्रम राबवावेत असा सल्ला दिला. तर संजय राठी म्हणाले की, रेल्वे स्थानकावर थंड पाण्याची व्यवस्था नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच याठिकाणी वॉटर कुलर लावण्यात आले. उन्हाळ्यात त्याचा प्रवाशांना चांगला लाभ झाला. आज केवळ औपचारिक लोकार्पण झाले असून, यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर रोटरी रेनबोचा भर राहील. अशा प्रकारच्या उपक्रमातून आत्मिक समाधान लाभते.

बातम्या आणखी आहेत...