आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका:समग्र शिक्षा अभियानाची फिरकी; वर्षभरात खात्यासाठी तीन बँका

जालना12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समग्र शिक्षाकरिता सिंगल नोडल अकाउंट म्हणून एचडीएफसी बँक नियुक्ती रद्द करावी अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी संघटनेने राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई यांना निवेदनाद्वारे केली आहे.

समग्र शिक्षाकरिता सिंगल नोडल अकाउंट म्हणून समग्र शिक्षा कार्यालयाकडून एचडीएफसी बँकेची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि त्या अनुषंगाने राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना एचडीएफसी बँक मध्ये खाते उघडण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, समग्र शिक्षा कार्यालयातून या संदर्भात वारंवार मुख्याध्यापकांना वेगवेगळे आदेशान्वये बँक बदलण्याबाबत निर्देश दिले जातात.

त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापक यांच्यामध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या कार्यालयातील २८ ऑगस्ट २०२१ च्या पत्रान्वये राज्याने सिंगल नोडल एजन्सी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे नियुक्ती करण्यात आली असून राज्यातील मुख्याध्यापकानी बँक ऑफ महाराष्ट्र येथे समग्र शिक्षा अभियानचे खाते खोलावे असे निर्देश दिले होते. मात्र लगेचच याच कार्यालयाने १८ सप्टेबर २०२१ रोजीच्या पत्रान्वये सिंगल नोडल एजन्सी म्हणून बँक ऑफ बडोदा यांची नियुक्ती करून राज्यातील मुख्याध्यापकांनी बँक ऑफ बडोदा येथे समग्र शिक्षा अभियानचे खाते खोलावे असे निर्देश दिले होते.

संबधित कार्यालयातील २७ जुलै २०२२ च्या पत्रान्वये सिंगल नोडल अकाउंट म्हणून एचडीएफसी बँकची नियुक्ती करण्यात आले असून राज्यातील मुख्याध्यापकांनी समग्र शिक्षाचे खाते एचडीएफसी बँक मध्ये उघडण्याबाबत निर्देश दिले आहेत. एकाच वर्षांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँक अशा तीन बँकेत खाते खोलण्याचे निर्देश समग्र शिक्षा कार्यालयाकडून होत आहेत. कार्यालयाच्या या संधिग्ध: प्रकारामुळे सातत्याने ह्या बँकेतून त्या बँकेमध्ये खाते खोलण्याच्या निर्देशाने मुख्याध्यापक वैतागून गेले आहेत. त्यामुळे समग्र शिक्षा करिता सिंगल नोडल अकाउंट म्हणून एचडीएफसी बँक यांची नियुक्ती रद्द करून समग्र शिक्षा करिता मुख्याध्यापकांनी ज्या बँकेत खाते खोलले आहेत त्याच बँकेचे खाते प्रमाणित करून आर्थिक व्यवहार करावा अशी मागणी संघटनेने केली आहे.

समग्र शिक्षा अभियानचे प्राथमिक शाळांचे बँक खाते महाराष्ट्र समग्र शिक्षा बँकेत उघडले होते. काही महिन्यांपूर्वी ही खाती उघडली अद्याप त्या खात्यावर अनुदान वर्ग झालेले नाहीये. आता महाराष्ट्र बँकेत उघडलेले खाते बंद करून आता नव्याने एचडीएफसी बँकेत खाते उघडण्याचा निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलाय. ‘एचडीएफसी’ बँकेच्या शाखा ग्रामीण भागात सगळीकडे उपलब्ध नाहीत. ज्या तालुक्यात शाखा नाहीत, तिथल्या शिक्षकांनी इतर तालुक्यातील वा जिल्हयातील बँकेत खाते उघडायचे आहे.

शाळेपासून दूर २५, ५०, ७५ किमी अंतरावरच्या बँकेच्या शाखेत येजा करताना शिक्षकांना प्रवास करायला लागेल. इतक्या दूर अंतरावर बँकेत आर्थिक व्यवहार करताना मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा शिकवण्याचा वेळ खर्च होणार आहे. खात्यावर वेळो वेळी व्यवहार करण्यासाठी बॅकेत चकरा होतीलच.

प्रशासन बँक खात्याबाबत आहे संदिग्ध
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बँक ऑफ बडोदा त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी बँक अशा वर्षभरात तीन बँक बदलल्या गेल्या आहेत. दुर्दैवाने हे सत्य आहे की, प्रशासन बँक खात्याबाबत संदिग्ध आहे. हे आदेश प्रशासनाने त्वरित रद्द करावेत. केवळ खाती उघडण्यातच धावपळ होत आहे. -संतोष राजगुरू, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना

बातम्या आणखी आहेत...