आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पुरवठा:जालना जिल्ह्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर ; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि ग्राहकांना अखंडित, दर्जेदार, विश्वसनीय व परवडणारा वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने सुधारित वितरण क्षेत्र योजना अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी ५०० कोटी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.जालना जिल्ह्यातील महावितरण अंतर्गत वितरण हानी कमी करण्याबरोबरच वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व वितरण कंपन्यांची कार्यक्षमता सुधारेल हे लक्ष समोर ठेवून ग्राहकांना अखंडित, दर्जेदार, विश्वसनीय व परवडणारा वीजपुरवठा देण्याची कटीबद्धता याचे भान ठेवून देशाचे पंतप्रधान .नरेंद्रजी मोदी यांनी (केंद्र शासनाने) सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा-अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित योजना कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. विद्युत क्षेत्राला अधिक सक्षम करण्याकरिता केंद्र शासनाने २०१४ मध्ये जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्युत पायाभूत सोयी-सुविधांचे सक्षमीकरण करण्याकरिता दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, तसेच शहरी भागातील विद्युत पायाभूत सुविधाचे सक्षमीकरण करण्याकरिता एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात आल्या, या दोन्ही योजनाद्वारे महावितरण कंपनीचे जिल्ह्यातील वितरण प्रणालीचे बळकटीकरण करण्यात आले.

सद्यस्थितीत या दोन्ही योजना पूर्ण झाल्या आहे. याशिवाय केंद्र पुरस्कृत सौभाग्य योजनेद्वारे विद्युतकरण न झालेल्या घरकुलाचे विद्युतीकरण करण्यात आले. उपरोक्त केंद्र पुरस्कृत विद्युत पायाभूत सुविधा योजना राबविल्यानंतरही एकूण तांत्रिक व वाणिज्यक हानी व सरासरी वीज पुरवठा खर्च व सरासरी प्राप्त महसूल यामधील अंतर जास्त आहे. याकरिता वीज वितरण कंपन्यांनी त्यांची कार्यरत कार्यक्षमता व आर्थिक स्थिरता यामध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे केंद्र शासनाचे निदर्शनास आले आहे. जेणेकरून ग्राहक सेवा मानकांप्रमाणे ग्राहकांना सेवा मिळेल. या योजनेच्या रु.५०० कोटींच्या आराखड्यात केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून लवकरच या कामाची निविदा निघून कामे चालू होतील असेही मंत्री दानवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...