आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीई कोट्यातून प्रवेश देण्याच्या नोंदणीला १ मार्च रोजी ३ वाजता सुरू करण्यात आली. याला १७ मार्च रोजीची डेडलाईन देण्यात आली होती. या वेळेपर्यंत तब्बल ६ हजार ३८ म्हणजेच क्षमतेच्या तिपटीने अर्ज आले. २५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वर्ष २०२३-२४ या वर्षी करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आरटीई प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन २३ जानेवारी २०२३ पासून सुरु केले. तर याला १० फेब्रुवारी रोजी ब्रेक देण्यात आला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबवण्यात येतेे.
त्यानुसार वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत काढून जालना जिल्ह्यात २९१ शाळांमध्ये २ हजार ७९५ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. दरम्यान, प्रक्रीया राबवल्याने ४० टक्के विद्यार्थ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या. हा गंभीर प्रकार लक्षात घेता यावर्षी यंत्रणेने थेट कार्यवाही करण्याचा धाक दाखवल्याने पहिल्याच टप्यात क्रांती घडून आली आहे. यावर्षी प्रक्रीया राबवुन १०० टक्के प्रवेश करण्यासाठी लवकर सुरूवात करण्यात आली आहे. वर्ष २०२३ - २४ साठी प्रक्रीया सुरू केली असून २८४ शाळांची १०० टक्के करण्याला यश मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.