आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूळच्या हैदराबाद येथील इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेच्या वतीने येथील हॉटेल अमित आर.पी रोड जवाहर बाग चौक जालना येथे प्रथमच १५ ते २० जून २०२२ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत विविध प्रकारच्या रुद्राक्षांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केल्याची माहिती इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेचे संचालक नरेंद्र काशीरेड्डी यांनी दिली. रुद्राक्षसंबंधी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, एक मुखी रुद्राक्षपासून २१ मुखी रुद्राक्षापर्यंत प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याचबरोबर एखाद्याच्या जन्मदिनांकावर आधारित रुद्राक्ष हवे असेल तर त्यासाठी वेदगणित शास्त्रानुसार रुद्राक्ष देण्यात येईल. त्यासाठी पंचांग अथवा कॉम्प्युटरची आवश्यकता नाही. ते म्हणाले, गौरीशंकर रुद्राक्ष आणि निसर्गदत्त रुद्राक्ष दोन्ही एकच असतात. सोन्याचे कवच असलेले रुद्राक्षही आमच्याकडे उपलब्ध आहे. प्रदर्शनामध्ये १०० रुपयांपासून दीड लाख रुपयापर्यंत रुद्राक्ष पाहायला मिळतील. प्रदर्शनामध्ये विक्री झालेला रुद्राक्ष नकली असल्याचे सिद्ध झाल्यास विकत घेतलेल्या रकमेच्या दहापट रक्कम देण्याचा आम्ही करतो. सिद्धमाळा, जपमाळा, स्पटीकमाळा, तुळशीमाळा, शाळीग्राम, शिवमाळा, ज्ञानमाळा अशा विविध प्रकारच्या रुद्राक्ष माळा प्रदर्शनात ग्राहकांना पाहायला मिळतील. शिवपुराणानुसार रुद्राक्ष माळा घातल्याने जीवनात सुख-समृद्धी, भरभराट होते. त्याअनुषंगाने ग्राहकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले. अधिक माहितीसाठी इंडस्-नेपाळ रुद्राक्ष संस्थेचे नरेंद्र काशीरेड्डी यांच्याशी संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.