आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहमेळावा:स. भु. प्रशालेत वर्गमित्रांचा रौप्यमहोत्सव; जालन्यातील सरस्वती भुवन प्रशालेचे 1997 वर्षातील वर्गमित्र

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेतील सन १९९७ वर्षाच्या दहावीच्या बॅचला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सर्व वर्गमित्र एकत्रित आले. शालांत परीक्षेनंतर सर्व विद्यार्थी आपापल्या करिअर, स्पर्धा, कुटुंब यात हरवून गेले. मात्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्व एकत्र आले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

रौप्य महोत्सवी वर्षात सर्व वर्गमित्रांनी एकत्र भेटावं असा विचार या बॅचमधील विद्यार्थिनी मनीषा वाघमारे (कोड्डीकर) हिच्या मनात आला आणि तिने तो विचार लगेचच आपल्या काही संपर्कातील वर्गमित्र-मैत्रिणींना कळविला. त्याला लगेच साद घालत मुख्य कमिटीत असलेल्या मित्र-मैत्रिणींना कार्यक्रम घेण्याच ठरवले. यावेळी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, गोवा, हैदराबाद अशा सर्व भागातून विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी पुन्हा एकदा शाळेतील गोड आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमासाठी भास्कर काळे, पोहेकर, विनायक देशपांडे, संजय देठे, सुरेश नंद, संध्या नाथ्रेकर, शोभा वडगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी अशोक निडवे, अन्साजी मांडवे, सुमंत डख, दीपक वडगावकर, पंकज कुलकर्णी, सारिका वैद्य, मनीषा वाघमारे, शिल्पा अंतरवालीकर, संजीवनी देशपांडे, अवंती झाडे, गणेश पांगारकर, बाबासाहेब नागवे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...