आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:सभुत माजी विद्यार्थी मेळावा; गुलाब पुष्प देऊन स्वागत

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेतील १९७९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरू जणांचा “कृतज्ञता सन्मान सोहळा साजरा केला. शालेय समितीचे अध्यक्ष सुनील रायठठ्ठा, मुख्याध्यापक पी.जी.बोराडे यांनी सर्वांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी माजी विद्यार्थी विधितज्ञ संजीव देशपांडे, नितीन कोलेश्वर, शशिकांत दाभाडकर, इंजिनिअर अरविंद शेंद्रे, नीलिमा खोत, दिलीप बांगड, रमेश फुलमाभडिकर, रविंद्र शेटे, सूर्यकांत रुद्राक्ष, प्रदीप खेरुडकर, दतात्रय दीक्षित, प्रकाश गोरवाडकर, व्यंकटेश सदावर्ते, सुरेखा गुंजकर, डॉ.नयन गोडबोले, डॉ.रमेश गाभने, नम्रता सहानी, माधुरी देशपांडे, शोभा शास्त्री आदी उपस्थित होते. प्रशालेचा गौरवशाली इतिहास बोराडे यांनी सांगितला तर माजी विद्यार्थी हे आमच्या प्रशालेचे वैभव तर आहेच पण आमची शान आहे असे गौरवोदगार सुनील रायठठ्ठा यांनी काढले.

बातम्या आणखी आहेत...