आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थांबा द्यावा:परतूर स्थानकावर सचखंड, नरसापूरला थांबा द्यावा

परतूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर रेल्वे स्थानकाला वार्षिक उत्पन्न ३,१६,५३, २९८ रुपये आहे. जनभावना लक्षात घेऊन सुपरफास्ट रेल्वे सचखंड आणि नरसापूर रेल्वेला परतूर स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री, रेल्वे व्यवस्थापक यांचेकडे भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. स्वप्नील मंत्री यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच परतूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस चौकी असूनही चेन स्नॅकिंग आणि दोन्ही फलाटांवर सुरक्षा भिंत नसल्याने असुरक्षित वाटत आहे. रेल्वे स्थानकावर प्रतीक्षालय सुरू करण्याबरोबरच दोन नंबर फलाटांवर डिस्प्ले बसवण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...