आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक दायित्व:सदामामाची पाणपोई भागवतेय वाटसरूंची तहान; कडक उन्हात थंडगार पाण्याने नागरिक होतात तृप्त

श्रीक्षेत्र राजूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न सरार्इची धामधूम, राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक व परीसरातील नागरीकांची वर्दळीत कडक उन्हाच्या चटक्यामुळे नागरीक हैरान होत आहेत. सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे. वाटसरुंना थंड पाणी पिण्यास मिळावे यासाठी राजूर येथील सदाशिव नागवे यांनी पाणपोईची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे नागरीक आजारी पडत आहे. सकाळी नऊ वाजेपासून उन्हाचा उन्हाचा चटका सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत असतो. राजुरेश्वरराच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तर लग्न सराई सुरू आहे. भावीक व नागरीकांमुळे राजूरात गर्दी वाढली आहे. घशाची कोरड कमी होण्यासाठी थंड पाण्याची गरज असते. उन्हाची तीव्रता पाहता बाटली बंद पाण्याचे भाव वाढले आहे.

परंतू सर्वसामान्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी सदाशिव नागवे यांनी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणपाई सुरू केली आहे. यंदाचे त्यांचे हे सहावे वर्ष आहे. दरम्यान, पाणपोईसाठी चार रांजणाचा वापर केला आहे. रांजणात गाळून पाणी भरले जाते. यामुळे शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळते. थंडगार पाणी होत असल्यामुळे पाणपोर्इवर अबाल,वृद्ध गर्दी करतात. सामाजिक भावनेतून आपण राजूरेश्वर मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणपोई सुरू केली असल्याचे सदाशिव नागवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...