आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संत गाडगेबाबांंचा स्वच्छतेचा संदेश सर्वांनी घ्यावा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंत गाडगे बाबांचा आदर्श समाजासमोर ठेवून प्रत्येकांनी काम केले पाहिजे, संत गाडगे महाराजांचा स्वच्छतेचा संदेश घ्यावा व अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांनी सांगितले.

जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे, प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, डॉ. सोमीनाथ खाडे, प्रा. सचिन जयस्वाल यांची उपस्थिती होती. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सोमिनाथ खाडे यांनी सांगितले की, रोज दोन सत्कर्म करावेत यासाठी गूगल पे सारखे उदाहरणे दिली. तर प्रा. सचिन जयस्वाल यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व परिसराच्या स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता करणारे संत गाडगे बाबा होते असे सांगितले.

प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमास एन. एस. एस. विभागाचे संपूर्ण पदाधिकारी डॉ. सोमीनाथ खाडे, प्रा. भिमराव वाघ, प्रा. डॉ. विठ्ठल गाडेकर, प्रा. डॉ. आलिया कौसर, भावड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. शोभा गायकवाड यांनी तर प्रा. रामनाथ पालवे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...