आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्युलर धर्मस्थळे:हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक सकलादी बाबा, नवस फेडण्यासाठी येतात लाखोंच्या संख्येने भाविक

कृष्णा तिडके | जालना2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामधील रवना पराडा येथील सकलादी बाबा दर्गा सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून देशभर प्रसिध्द आहे. येथे पौष महिन्यात मोठी यात्रा भरते. शिवाय मोहरमच्या काळात सवारीही निघते. या दोन्ही उत्सवांत हिंदू-मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

बाबा हजरत हाफेज सय्यद अलाऊद्दीन चिश्ती यांचा हा दर्गा सकलादी बाबा नावाने प्रसिद्ध आहे. हा दर्गा जवळपास ७०० वर्षे जुना आहे. सर्वधर्मीय भाविक गेल्या अनेक वर्षांपासून येथे येतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे भाविकांना येथे येणे शक्य नाही. येथील दर्ग्याच्या वतीने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत आहे.

नवस फेडण्यासाठी येतात लाखोंच्या संख्येने भाविक

येथे वर्षभर भाविक येतात. त्यातही गुरुवार आणि शुक्रवारी कंदुरीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. तर पौष महिन्यात तिसऱ्या व चौथ्या गुरुवारी वार्षिक यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक नवस फेडण्यासाठी येतात. नवसासाठी आलेला प्रत्येकजण कंदुरी नैवेद्य दाखविताना भात व पोळीच्या मलिद्याचा नैवद्यही दाखवतो.

बातम्या आणखी आहेत...