आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्यपदक:राज्य ज्युदो स्पर्धेत जालन्यातील साक्षीने पटकावले कांस्यपदक

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे येथे झालेल्या राज्यपातळीवरील ज्युदो स्पर्धेत जालन्यातील साक्षी संतोष बोरगावकर हिने २८ किलो खाली वजन गटात तृतीय पटकावून कांस्यपदकाची मानकरी ठरली. इतर पाच जणांनीही चकमदार कामगिरी केली.

राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी जालना जिल्हा अमॅच्युअर ज्युदो संघटनेने आपला आठ जणांचा संघ धुळे येथे पाठवला होता. ही स्पर्धा ३ ते ६ नोव्हेंबर २०२२ अशी होती. या स्पर्धेत सबज्युनियर मुली ज्युदोपटू साक्षी संतोष बोरगावकर ही २८ किलो खाली वजन गटात तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदकाची मानकरी ठरली. तसेच ३२ किलोखालील वजन गटात गौरी बोरगावकर, ४० किलोखालील वजन गटात भक्ती घारे, ४८ किलो खाली वजन गटात कल्याणी विष्णू वाघ, ६६ किलो वजन गटात प्रेम पारचा तसेच कॅडेट स्पर्धेत ५५ किलोखालील वजन गटात सौरव वाघ, ४० किलो वजन गटात विधी बियाणी, ५७ किलो वजनी गटाखाली सानिका कवडे या सर्वांनी उत्तम कामगिरी केली.

या स्पर्धेकरिता महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अॅड. धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक, महाराष्ट्र तांत्रिक ज्युदो समितीचे अध्यक्ष रवी पाटील, तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे व भारतीय ज्युदो संघाचे प्रमुख मार्गदर्शक सतीश पहाडे सेन्से यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा सुनीता मोहिते, अमोल मोहिते, श्री म. स्था. जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक शांतीलाल वानगोता यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...