आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:खतांची चढ्या दराने विक्री, कृषी केंद्रांचे परवाने रद्द करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

जाफराबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यात रासायनिक खतांची चढ्या दराने विक्री होत असून अशी विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकरी शेती मशागतीचे कामे आटोपून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची शेतकऱ्यांना पेरणीसाठी अवश्यकता आहे. परंतु जाफराबाद तालुक्यात जाणिवपूर्वक रासायनिक खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करून सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत आहे. तसेच कृषी केंद्रावर रासायनिक खते सरकारने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या व शेतकऱ्यांची अडवणूक करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कृषी केंद्रांवर कठोर कार्यवाही करून त्यांचे परवाने रद्द करावे. तसेच शेतकऱ्यांना काही खतांसोबत दुसरे खत घ्यावे लागेल, अशी सक्ती करणाऱ्या कृषी केंद्रांवर सुद्धा कठोर कारवाई करावी.

बातम्या आणखी आहेत...