आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर घडला प्रकार:सेलूत वरिष्ठ लिपिकास तरुणांनी काढले बदडून

सेलू6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नूतन महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या विलास साळवे या कर्मचाऱ्यास महाविद्यालयाच्या समोर असलेल्या ग्राउंडवर दहा-बारा तरुणांनी एका ४० वर्षीय महिलेस सोबत हुज्जत घालत असताना मारहाण केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली.

वरिष्ठ लिपिक विलास साळवे यांच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेसोबत हुज्जत घालत असतांना दहा-बारा तरुण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विलास साळवे यास मारहाण करत त्याच्याजवळ असलेला मोबाईल व रोख रक्कम घेतली. घडल्या प्रकारानंतर विलास साळवे यांनी माराच्या भीतीपोटी घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळासह शहरात प्रचंड खळबळ उडाली अाहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी गुरुवारी प्राचार्य महेंद्र शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता ते कार्यालयात नाहीत. असे एवढेच सांगितले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी कुणाकडूनच पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली नाही. मात्र या घटनेची शहरात जोरदार चर्चा केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...