आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्याला उजाळा:साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना जिल्हाभरात विविध उपक्रमांतून अभिवादन..

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयांत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

रंगनाथ महाराज विद्यालय जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथील श्री.रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य उद्धवराव म्हस्के, सहाणे, कोरडे, यादव, घोंगे, खरात, मेहेत्रे, प्रा.लेंडीकर, प्रा.लखवाळ, प्रा. चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एन. एस. मोरे यांनी तर प्रा. टी. के. शेवाळे यांनी आभार मानले.

शाहू महाराज विद्यालय जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सी. जी. वाघमारे, प्रतिक्षा चौधरी, आदित्य म्हस्के, रितेश म्हस्के, रोहित जाधव, डी. एन. सोनकांबळे, वाय. बी. मदन, एस. आर. कुलकर्णी, वाय. बी. मदन, डी. एन. सोनकांबळे, पी. पी. नागरे, ए. बी. देशपांडे, एल. बी. जाधव. आर. एस. ठाकरे, एस. बी. राऊत, एम. ए. खरात आदी उपस्थित होते.

भराडखेडा साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भगवान बारगाजे, बाबासाहेब दराडे, कृष्णा दराडे, रुस्तम मुळक, शामराव घोरपडे, त्र्यंबक मुळक, सर्जेराव तुपे, प्रकाश शिंदे ,सुनील दराडे, विलास तुपे, रामेश्वर दराडे, महिंद्र साबळे, दीपक शिंदे, देविदास घोरपडे, मुकेश आरसूड, बद्री खरमुटे, सुरेश घोरपडे, अनिल घोरपडे आदींची उपस्थिती होती.

सिद्धार्थ महाविद्यालय येथील सिद्धार्थ महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य, डॉ. शाम सर्जे, प्रा. डॉ. रमेश देशमुख, उपप्राचार्य, डॉ. सुनील मेढे, प्रा. विनोद हिवराळे, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. मदन मगरे याची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. सरिता मनियार यांनी तर प्रा. सुनंदा सोनुने यांनी आभार मानले उपेक्षितांना महानायकत्व देणारे अद्वितीय साहित्यरत्न उपेक्षित दुर्लक्षित, बहिष्कृत समाजातील फाटक्या माणसाला साहित्याच्या माध्यमातून महानायकत्व देताना त्यांच्या आंतरिक दुःखाला जगासमोर आणण्याचे काम अण्णा भाऊ साठेंच्या लेखणीने केले. यापूर्वी कधीही न आलेले मराठी साहित्यातील वास्तववादी चित्र अण्णा भाऊंच्या लेखणीतून जगासमोर आले, असे प्रतिपादन आधुनिक सत्यशोधक भारूडकार प्रा. अनिल मगर यांनी केले. तक्षशिला बुद्ध विहार समिती, पिंपळगावच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास, साहित्य प्रवासावर विचार मांडले. प्रा. आदिनाथ सदाशिव यांनी मनाेगत व्यक्त केले. मुख्य आयोजक प्रकाश बोर्डे यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन देवानंद बोर्डे यांनी तर सुभाष बोर्ड यांनी आभार मानले. आषाढी पौर्णिमेपासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे प्रा. मगर पठण व विश्लेषण करत आहेत. यावेळी बौद्ध उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हाेती.

राम रहिम विद्यालय भोकरदन तालुक्यातील सिपोराबाजार येथील राम-रहीम विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विनायक कड, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. सपाटे, डी. ए. महाजन, प्रतिभा उगले, व्ही. एम. बोकन, पी. यू. काकड, विजयकुमार मस्के, गोविंद सोनवणे, लियाकत खान पठाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एस. डी. लहाने यांनी केले. सूत्रसंचालन जे. एस. कुदर यांनी तर एस. एस. गिरनारे यांनी आभार मानले.

भाजप सांस्कृतिक सेल भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलतर्फे अण्णाभाऊ साठे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, दीपा बिनीवाले, वर्षा चाटूफळे, रोहिणी टाकळकर, विद्याताई देशमुख आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...