आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम:लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात आले.विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीनाथ वाडेकर हे होते. या वेळी पर्यवेक्षक एम.एस लांडगे, अनिल पाटील, किसन माने, प्रा.राजेंद्र आंधळे, राजू वाहुळे, प्रा.बापूसाहेब शिंदे, सुनील खेडेकर, मधुकर नागरे, वामन घडलिंग, अरुणकुमार लांडगे, प्रकाश वाढेकर यांची उपस्थिती होती. शाळेतील विद्यार्थिनी अंजली गजर, संध्या वाढेकर, ॠतुजा गजर, पल्लवी गजर यांची भाषणे झाली. कार्यक्रमात ‘ सुबह सवेरे ‘ ही प्रार्थना आस्मा चौधरी, सुहाना परसूवाले, प्रियंका गजर, मनिषा गजर, प्रीती जाधव, नाझीया दरगेवाले सादर केली. कार्यक्रमात तेजस्विनी लहाने, ॠतुजा वाढेकर, संजना वाहुळे, राजनिलम पवार, गायत्री उभेकर, शुभांगी इंगळे, आरती पाटील, भक्ती वाढेकर, अंजली गजर, दिव्या वाढेकर या विद्यार्थिनी प्रार्थना सादर केली. एम. एस लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...