आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

जाफराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला देश तथा महाराष्ट्र भुमी म्हणजे साधु संत थोर महात्म्यांची असुन येथे जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास यशस्वी जिवन जगता येते म्हणुन त्यांनी दाखविला मार्ग त्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे मनात उच्च ध्येय ठेवुन तथा आपण आपल्या देशाच समाजाच काहीतरी देणं लागतो या भावनेतुन जिवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक तथा विचारवंत अंबादास साळवे यांनी केले. संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी विठ्ठल साळवे, शरद टोपे, सुनिल मुळे, सतिश दुबे, सुर्यकांत साळवे, प्रमोद साळवे, भागवत सोनवने, रवि टोपे, सुनिल साळवे, कृष्णा साळवे, छगन बकाल यांची उपस्थिती होती. साळवे म्हणाले, आपला देश, समाज आपल्या कुटुंबाचे भविष्य युवकांच्या हाती असुन युवकांनी पहिले शिक्षण नंतर नौकरी अन्यथा व्यापार हे ध्येय प्राप्त करावे. विविध जबाबदाऱ्या स्विकारुन त्या पेलावल्याही पाहिजेत यासाठी परिश्रमाचीही परीकाष्ठा करण्याची तयारी ठेवावी तर ध्येयप्राप्तीसाठी जिद्द धाडस चिकाटी असावी व समाजातील प्रत्येक व्यक्तींने मनातील न्युनगंड बाजुला सारुन समाजसेवा, राष्ट्रसेवेसाठी पुढे येण्याची गरज असुन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांना कला, क्रीडा, साहित्याबरोबरच संशोधन, विज्ञान, सांम्प्रदाय, राजकारणात रुची वाढवावी. असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...