आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:जिल्हाभरात महाराष्ट्र दिन अन् कामगार दिनी तिरंग्याला सलामी; पोलिस, कामगार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयांत झेंडावंदन, विविध सामाजिक उपक्रम

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, पक्ष कार्यालय, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था कार्यालय, बँका आदी ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देऊन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. लायन्स क्लबतर्फे मिठाईचे वाटप करण्यात आले.

छत्रपती संभाजी विद्यालय
फत्तेपुर | भोकरदन तालुक्यातील तांदूळवाडी येथील श्री छञपती संभाजी विद्यालयात प्राचार्य संजय पैठणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ५ ते ९ आणि ११ वी कला व विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपञक वाटप करण्यात आली. याप्रसंगी सरपंच रामेश्वर चिकटे, माजी सरपंच विलास पाटील सावंत, माजी सरपंच भगवानराव चिकटे, सुनिल वेलदोडे, ज्येष्ठ शिक्षक डी. बी. ठाकरे, के. व्ही. फुके, पी. एम. पाटील, प्रा. भगवान जाधव, प्रा. ज्ञानेश्वर कड, राजेंद्र डेढवाल, प्रा. आशा ठाकुर, उषा खैरे, कमल सोनवणे, जे. एच. सुरासे, एम. बी. भंडारे, एच. यु. गव्हाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी चांगले भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने गौरविण्यात आले.

भाजप जिल्हा कार्यालय
जालना | महाराष्ट्र दिनानिमीत्त भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राजेश राऊत, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अतिक खान, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, प्रा.राजेंद्र भोसले, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सले, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, तुलजेश चौधरी, प्रदेश वैद्यकीय सह संयोजक अमोल कारंजेकर, भाजयुमो उपाध्यक्ष रवि अग्रवाल, विकास कदम, डोंगरसिंग साबळे, अमोल झारखंडे, गोवर्धन कोल्हे, सचिन जाधव, विठ्ठल नरवडे, शरद आंबले आदींची उपस्थिती होती.

सीटूच्या वतीने रॅली
जालना | सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)जालना कमिटीच्या वतीने कामगार दिनानिमित्त आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने गांधी चमन ते सिटू भवनपर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत जागतिक कामगार दिन चिरायू होवो, महाराष्ट्र दिन चिरायू होवो, सिटू संघटना जिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजय असो अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना सीटूचे राज्यसचिव अण्णा सावंत म्हणाले, कामगारांच्या लढ्यातून जे अधिकार मिळाले त्यांनी आठवण म्हणून हा जागतिक कामगार दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनात देखील मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी होते. तसेच त्या लढ्यात १०६ कामगार शहिद झाले.

त्यामुळे जागतिक कामगार दिनीच महाराष्ट्र दिन देखील साजरा केला जातो. यावेळी आशा वर्कर्स संघटनेच्या राज्य अध्यक्षा आनंदी अवघडे, उज्वला पडलवार, सिटूचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, गोविंद आर्द्ड, अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सुनंदा तिडके, शेतमजूर युनियनच्या जिल्हाध्यक्ष सरीता शर्मा, विशेश्वर स्वामी, कल्पना आर्द्ड, अनिल मिसाळ, सुभाष मोहिते, बाबासाहेब पाटोळे, हरिश्चंद्र लोखंडे, मीना भोसले, शरद ढेरे, यशोदा तावरे, मीरा जिगे आदींची उपस्थिती होती.

सरस्वती भुवन प्रशाला
जालना | येथील सरस्वती भुवन प्रशालेत महाराष्ट्र दिन मुख्याध्यापक पी. जी. बोराडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या अंजली बडवे, उपमुख्याध्यापक रत्नाकर वाडेकर, सुरेश नंद, साईनाथ तानुरकर, प्रा.लक्ष्मण गोर्डे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन जयंत आमले यांनी तर दिनेश संन्याशी यांनी आभार मानले. यावेळी कैलास भालेराव, रत्नाकर लांडगे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

जाफराबादेत उत्कृष्ट कामगारांचा गौरव
जाफराबाद | येथील नगरपंचायतीच्या प्रांगणावर नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य साधून शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा यासह विविध कामे जबाबदारीने व उत्कृष्टपणे काम करणाऱ्या चंद्रभागाबाई लोखंडे, विरुपाल मिसाळ, इनायतखा पठाण यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी पुजा दुधनाळे, उपनगराध्यक्ष शेख रऊफ, बांधकाम सभापती तालेब पठाण, गटनेते शे. मुजीब, दामुअण्णा वैद्य, नगरसेवक दिपक वाकडे, नगरसेवक अनिल बोर्डे, सुनीता गोफणे, विजया शिंगणे, भारत पाटील, प्रकाश वाकडे, कांतीलाल बन्सवाल, रावसाहेब इच्चे, धिरज गोफणे, शे.अकील, तैजीब कुरेशी, कृष्णा वाकडे, सुनिल छडीदार, दिलिप हिवाळे, गजानन गायकवाड आदी उपस्थित होते.

शेंडगे विद्यालय
जालना | येथील चंदनझिरा परिसरात असलेल्या शिवाजीराव शेंडगे विद्यालयात युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अमेाल ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बालासाहेब आबुज, जगन्नाथ चव्हाण, कांतराव रांजनकर, बबनराव थोरात, रियाज पठाण, बाबासाहेब शेरकर आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला कृष्णा घाडगे, शोभा काळे, उषा इंगळे, तुळशीराम काळे, राहुल मुंडे, धोंडीराम पवार, राजु साळवे, बालाजी भिसे आदी उपस्थित होते.

लायन्स क्लब तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जालना | महाराष्ट्र दिन व जालना जिल्हा निर्मिती दिनाचे औचित्य साधून जालना लायन्स क्लबच्या वतीने बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले विद्यालयात प्रांतीय रिजन चेअर पर्सन सुनील बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कला, क्रीडा स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण सोलाट, प्रोजेक्ट चेअरमन संतोषकुमार दुधानी, डायमंड क्लबचे अध्यक्ष मोहन इंगळे, ध्रुवकुमार अग्रवाल, लॉयन्सचे सहसचिव राजेंद्र बजाज, मुख्याध्यापक रवींद्र भडांगे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन म्हस्के यांनी तर अंभोरे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...