आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाजी ब्रिगेड गेल्या तीस वर्षापासून राज्यातील शेतकरी, कामगार, युवक, युवती, महिला, विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी सतत शासनाशी लढत आले आहे पण इतर सर्व पक्षांनी आपल्याच कार्यकर्त्यांनाच लाभ देत मतदार, जनतेला लाथाडले आहे. आजची गंभीर परीस्थितीकडे, महागाई, नोकरीची मारामार, याकडे सोइस्कर दूर्लक्ष करीत आहे. यामुळे संभाजी ब्रिगेड १०० टक्के समाजकारणाला १०० राजकारणाची जोड देवून सर्व सामान्याचे प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे राज्य कोषाध्यक्ष संतोष गाजरे यांनी सांगितले.
शिवराज्यभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड दक्षिण जिल्हाच्या वतीने अंबड येथील पंडीत गोंविदराव जळगावकर नाट्यगृहात जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड यांच्या मार्गदर्शनात शिवशाहीर अरविंद घोगरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. उदघाटक म्हणून ते बोलत होते. विचारपिठावर विभागीय अध्यक्ष संदीपान जाधव, उपविभागीय पेालिस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार विद्याचरण कवडकर, प्रा. सूदर्शन तारख, गौरव खैरनार, विजय वाडेकर, दत्तात्रय कपाळे, संतोष चाळसे, प्रा. सोपानराव तेलगड, राधा कवडकर, ज्ञानेश्वर ऊढाण, भरत मानकर, प्रा.निहाळ, बाळासाहेब खवने आदींची उपस्थिती होती.
प्रदेश संघटक प्रा.सूदर्शन तारख यांनी संभाजी ब्रिगेडची भूमिका विषद केली. अध्यक्षीय समारोपात संदीपान जाधव यांनी भविष्यात संभाजी ब्रिगेडला सत्तेत आणनार असल्याचे ग्वाही दिली. पोवाड्याचा कार्यक्रमात शाहीर अरविंद घोगरे यांनी शिवाजी महाराजांचा जन्म ते राज्यभिषेकापर्यंत अभ्यासपूर्ण संदर्भदेत अंगावर शहारे आणनारा कार्यक्रम सादर केला. यावेळी प्रा.सोपानराव तेलगड यांना राज्यस्तरीय गौरव पूरस्कार मिळालाबद्दल व मंठा तालूकाअध्यक्ष यांनी ब्रिगेडचे उत्तम बांधणी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले. कार्यक्रमाला नारायण निंबाळकर, रामप्रसाद वाघ, जगन्नाथ काळे, विनायक टापरे, धनंजय चावरे, संतोष पोखरकर, वाजेद शेख, डॉ. तौर, राजेद्र काकडे, भगवान काकडे, धर्मराज पोखरकर, रामेश्वर राजपूरे, चंद्रकांत झोले, हनुमान भूमकर, किशोर सोळंके, ऋषीकेश वांघूडे, गणेश साळूंके आदी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.