आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृध्दी महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यातून जातो. राज्याच्या अर्थकारणास कृषी विकासास तसेच दळणवळण क्षेत्रास समृध्द करणारा हा महामार्ग आहे. या महामार्गाची व्याप्ती तसेच केलेले निर्माण कार्य महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहचवावे. या उद्देशाने इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री समृध्दी चषक निबंध स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले आहे.
यामध्ये वर्धा, नागपूर, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर या आठ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून, जिल्ह्यात १६ विजेते तसेच ३२ उपविजेत्यांचा गौरव होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारने निर्माण केलेला देशातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग आहे. समृद्धी महामार्ग हा नागपूर-मुंबई या दोन शहरांना जोडणारा महामार्ग महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधून जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.