आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा येतोय:‘संस्कार’च्या विद्यार्थ्यांचा शाडू मातीच्या गणपतीची स्थापना करण्याचा संकल्प, ४०० विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बाप्पा येतोय’या विशेष कार्यक्रमातून जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या ४०० विद्यार्थ्यांना शाडू गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या घरी शाडू मातीच्या गणपतीची स्थापना करून त्याबरोबरच आपापल्या गल्लीतही एकच गणपती बसवण्याची शपथ घेतली.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यासाठी संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाने पुढाकार घेत ‘बाप्पा येतोय’ या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात मूर्तिकार उमेश कापसे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या माती पासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी इयत्ता आठवी, नववी, दहावीतील ४०० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक ईश्वर वाघ, किरण धुळे, रशीद तडवी, माणिक राठोड, रेखा हिवाळे, कीर्ती कागबट्टे, शारदा उगले, स्वप्नजा खोत, अश्विनी शहाणे, शिक्षकेतर कर्मचारी नितेश काळे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, विनायकराव देशपांडे, प्रा.राम भाले, प्रा. केशरसिंह बगेरीया आदींनी कौतुक केले आहे. दरम्यान, तर ‘ बाप्पा येतोय’ या कार्यशाळेचे आयोजन केल्याने आम्ही स्वतः गणपतीची मूर्ती तयार करू शकलो आणि स्वतः तयार केलेल्या गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा आनंद मिळणार असल्याचे विद्यार्थिनी अंकिता नन्नवरे, आरती पवार, माधवी पवार,अनुष्का ढेकळे, ऋती खांडेभराड यांनी सांगितले.

शाडू मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची विद्यार्थ्यांना दिली शपथ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्यामुळे जलप्रदूषण होते. याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः शाडूच्या मातीची मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करावी अशी शपथ देण्यात आली. गणपतीचे विसर्जन घरीच कुंडीत करून त्यात घरातील गणपतीला बारा महिने फुले मिळतील असे फुलाचे झाड लावण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केल्याचे उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...