आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरीत्या वाळू उपसा:डोल्हारा येथे वाळूमाफियांचा‎ महसुलाच्या पथकावर हल्ला‎

परतूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डोल्हारा येथे‎ वैधरीत्या वाळू उपसा करून‎ चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर‎ कारवाई करण्यासाठी गेलेल्या‎ महसूल विभागाच्या पथकावर वाळू‎ माफियांनी हल्ला चढविल्याची‎ घटना रविवारी घडली.‎ उपविभागीय अधिकारी‎ भाऊसाहेब जाधव आणि तहसील‎ कार्यालयातील काही तलाठ्याने‎ पथक रविवारी सकाळी ११ वाजता‎ वाळू माफियांवर कारवाई‎ करण्यासाठी डोल्हारा शिवारात गेले‎ होते.

दुपारी १२ वाजेच्य सुमारास‎ डोल्हारा शिवारातील पाणंद रस्त्यात‎ वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर‎ परतूरच्या दिशेने जात असल्याचे‎ पथकाला आढळून आले.‎ पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर‎ चालकाला वाळू आणि ट्रॅक्टरचा‎ परवाना विचारला असता त्याने‎ उडवाउडवीची उत्तरे दिली.तसेच‎ ट्रॅक्टर चालक महेश उर्फ डूबऱ्या‎ बालू काळे याने पथकातील तलाठी‎ विजय विष्णू जाधव यांच्या अंगावर‎ ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न‎ केला.

त्याच्या सोबत असणाऱ्या‎ इतर साथीदारांनी देखील इतर‎ कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत‎ मारहाण केलीव विना क्रमांकाचे‎ वाहन घेऊन तो फरार झाला. तलाठी‎ विजय विष्णू जाधव यांचा‎ फिर्यादीवरून महेश उर्फ डूबऱ्या‎ बालू चव्हाण आणि तर दोन‎ अनोळखी आरोपींविरोधात परतूर‎ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.‎

बातम्या आणखी आहेत...