आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू उपसा:लिलाव नसतानाही वाळू उपसा

गेवराई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातून सध्याच्या परिस्थितीत अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभागाच्या वतीने मागील आठवड्यात काही कारवाया झाल्या आहेत मात्र तरीही अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात गोदावरीचे पात्र ७० कि.मी.असून ३२ वाळुघाट आहेत. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत नदी पात्रात जवळपास बहुतांश ठिकाणी दुथड्या पाणी असताना तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातील राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, सुरळेगावसह काही ठिकाणी नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. या ठिकाणाहून केनीच्या माध्यमातून वाळूचा अवैध वाळू उपसा करून हायवा, ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेकडो ब्राॅस वाळू वाहतूक केली जात आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी मागील आठवड्यात काही ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने चार कारवाया करण्यात आल्या आहेत.

थातुरमातूर कारवाया करून आम्ही कारवाया करत असल्याचा बडेजाव केला जात आहे मात्र गेल्या काही दिवसापासून अवैध केनीच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी सर्रास वाळू उपसा करून हायवा आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून बिनदिक्कतपणे वाहतूक सुरु आहे.

गोंदीसह इतर ३२ वाळू घाटाचे झाले नाहीत लिलाव
तालुक्यातील गोदावरीच्या पात्राच्या ठिकाणी राक्षसभुवन, सुरळेगाव, म्हाळस पिंपळगाव, सावरगाव नि., खामगाव, पांचाळेश्वर, संगम जळगाव, हिंगणगाव, गंगावाडी, आगर नांदर, गोंदी सह इतर ३२ वाळुघाट आहेत. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत कोठेही वाळूचा लिलाव झाला नाही तरीही उपसा सुरुच आहे.

बातम्या आणखी आहेत...