आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल रामनगर येथील श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक संदीप रामभाऊ नवगीरे यांना उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार डॉ. वैशाली जामदार (शिक्षक उपसंचालक नागपूर), डॉ. रत्ना गुजर (संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर), व अभय यावलकर (मराठी विज्ञान परिषद, मुंबई) यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्य विज्ञान व गणित संस्था, रवीनगर नागपूर, येथील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात इन्स्पायर अवार्ड राष्ट्रीय स्तरीय प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा २०२०-२१ मध्ये ६ लाख प्रकल्पातून उत्कृष्ट ६० मध्ये महाराष्ट्रातील सुवर्णपदका सह ९ विद्यार्थी विजय झाले होते. यामुळे महाराष्ट्राची मान अधिकच उंचावली आहे. या विजयी विद्यार्थी व त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक यांच्या कार्याची दखल घेत राज्य विज्ञान संस्था नागपूर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला विज्ञान पर्यवेक्षक राजू नेब, विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळ सदस्य, इन्स्पायर अवर्डचे राज्य तसेच जिल्हा समन्वयक हे उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव म्हस्के, प्राचार्या छाया वरगणे, गजानन म्हस्के, प्रभाकर शेजुळ आदींनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.