आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पीएम किसान योजनेचे  रखडलेले अनुदान तत्काळ देण्याची संघर्ष समितीची मागणी

सेलू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पी. एम. किसान योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेले नाही अशी तक्रार शुक्रवार, २ डिसेंबर रोजी सेलू शिवार शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे शासनाकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी दिला जात आहे.

परंतु ऑक्टोबर २०२२ मध्ये आलेली रक्कम सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. यासंदर्भात चौकशी केली असता सेलू तालुक्याचे नाव सेलूऐवजी बुटाला असे झाले आहे. शेतकरी असूनही लँड सिडींग नो असे दाखवत आहे. वेळेवर केवायसी पूर्ण केलेली असताना देखील अनुदान जमा होत नाही असे निवेदनात म्हटले असून या निवेदनावर गणेश गोरे, रामप्रसाद सुरवसे, शिवकुमार नावाडे, दत्तराव गोरे,रामदास जाधव, धोंडीबा खामकर, दत्तराव जाधव, रामकृष्ण शेरे पाटील, बंडू ढोबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...