आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना तालुक्यातील रामनगर परिसरात असलेल्या रामनगर ते जैतापूर फाटा १३ कि.मी, बाजीउम्रद-तलावसावंगी १० किमी. आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा ३ कि.मी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या तिन्ही रस्त्यांच्या कामांना मंजूरी देवून तात्काळ नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजप ग्रामीण, भाजपा तालुका युवा मोर्चासह ग्रामस्थांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की,जालना तालुक्यातील रामनगर ते जैतापूर फाटा १३ कि. मी रस्ता, बाजीम्रद ते तलाव सावंगी फाटा १० कि. मी रस्ता तर मानेगाव ( जा ) ते लालदेव फाटा या तिन्ही मार्गांवरील रस्ते पूर्णतः खड्ड्यात गेले असून, दळण - वळणासाठी या रस्त्याव्यतिरिक्त पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांसह कष्टकरी वर्गाच्या विकासाला खोडा बसत आहे, रामनगर ते जैतापूर फाटा या दरम्यान मौजपुरी, भिलपुरी, निरखेडा, मानेगाव (खा), मानेगाव (जा), गणेशपूर यासह मोतीगव्हाण, दहिफळ, तलाव सावंगी, जैतापूर, अंतरवाला, पाहेगाव आदी ३० ते ३५ गावांचा संपर्क येतो.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष पांडूरग पोहेकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परसराम तळेकर, नारायण मोहिते, नारायण जाधव, तुकाराम राठोड, बी.एस.शेळके, सतीश हांडे, दौलतराव भुतेकर , दत्ता जाधव, विष्णू गुळवे, नारायण वाघचोरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
रात्री-अपरात्री वाहनचालक टाळाटाळ करतात
जालना हे जिल्हा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा तालुक्याशी दररोजचा संपर्क येत असून, शेतकऱ्यांनासह, व्यापारी, दुकानदार, शालेय विद्यार्थी आदींना वरील तिन्ही रस्तावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. खड्डे चुकविण्याच्या नादात दररोजच किरकोळ अपघात होत असून, महिला, प्रवाशी, रुग्ण यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील ग्रामस्थांना रात्री - अपरात्री गरज पडल्यास वाहनचालक टाळाटाळ करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.