आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धा, रूढी, परंपरेंच्या जोखडातून बाहेर काढले

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी केले असल्याचे प्रतिपादन प्रा. अश्विनी क्षीरसागर यांनी केले.

जालना तालुक्यातील नाव्हा येथील कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मेघना पत्की, प्रा. गजानन कदम, प्रा. भुमेश्वर चाटसे, विठ्ठल झारखंडे, अविनाश छडीदार आदींची उपस्थिती होती. प्रा. क्षीरसागर यांनी संत गाडगेबाबा हे स्वछता अभियानाचे जनक होते. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमातून त्यांनी फक्त स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. एक समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन ‘स्वच्छते’ चा महामंत्र संपूर्ण देशाला दिला. आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार करून माणसातील खऱ्या देवाचे दर्शन जनतेला करून देणारे आणि संपूर्ण विश्वाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्याचे सांगितले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

विझोरा महाविद्यालय
धावडा । भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबांच्या जीवनाकार्याला उजाळा देण्यात आला. प्राचार्य बबन तळेकर, प्रा. अविनाश गवळी, प्रा. गोपाल लाठे, गोपाल लेणेकर, प्रा. किरण गवळी, गणेश गवळी, योगेश कानडजे, जगन्नाथ आढाव, समाधान गवळी, सौरभ रोकडे, मंगेश चिंचोळकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

तीर्थपुरी सावता परिषद
तीर्थपुरी । संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीर्थपुरी येथे सावता परिषदेच्यावतीने प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अर्जुन जाधव, अशोक खेत्रे, संजय बोबडे, अशोक मोरे, अशोक वाघुंडे, विष्णू कडूकर, गणेश खरात, कैलास पठाडे, गणेश गिराम, दत्ता बोबडे, सावता परिषदेचे घनसावंगी तालुकाध्यक्ष जनार्दन बारवकर आदींची उपस्थिती होती. यावेळी गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

लक्ष्मणराव जाधव विद्यालय, गुंज बुद्रुक
जालना । घनसावंगी तालुक्यातील गुंज बु्द्रुक येथील लक्ष्मणराव माधवराव जाधव विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रभाकर खरात, भिकनराव गाढे यांनी कर्मयोगी राष्ट्र संत गाडगे बाबांचा जीवनपट मांडला. तर मुख्याध्यापक डॉ. प्रभाकर शेळके यांनी आपल्या विचारांतून समकालीन वास्तवाचे भान व जाणं देणारी राष्ट्र संत गाडगबाबांच्या विचारांची पेरणी केली असे सांगितले. यावेळी अनिता पवार, शेख वहाब, सुशील कोरडे अभिमान्यु टोके, शिवाजी हुंबे, प्रल्हाद जाधव होते.

बातम्या आणखी आहेत...