आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायंडा कायम:सिंधीपिंपळगावात सरपंच बिनविरोधची परंपरा; उच्चशिक्षित अंजली शिरशाटची ग्रामस्थांनी लावली वर्णी, गावात सत्कार

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील सिंधी पिंपळगाव गावाने मागील ३० वर्षापासून सरपंचपद बिनविरोध करण्याचा पायंडा कायम ठेवला आहे. एक रुपयाही खर्च न करता, भांडण- तंटा न करता थेट सरपंच पद ही बिनविरोध ठरवतात. असा अनोखा आदर्श निर्माण करणाऱ्या गावाला यावर्षीच्या निवडणुकीत गणित विषयात एम.एस्सी असे उच्च शिक्षण घेतलेल्या अंजली वैजीनाथ शिरसाट या तरुणीची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी त्यांचा सत्कार केला.

गावात माजी जि.प.सदस्य कैलासराव चव्हाण, माजी सरपंच बबनराव सिरसाठ, भास्करराव चव्हाण, राजाभाऊ सिरसाठ, चेअरमन जनार्दनराव सिरसाठ, मधुकरराव चव्हाण, शिक्षक लक्ष्मणराव सिरसाठ, रंगनाथराव मोरझडे, श्रीमंत जिगे, श्रीरंग चिंचपुरे, शंकरराव सिरसाठ, मोतीराम गायकवाड, बाबासाहेब मिसाळ, दौलत लोखंडे हे सर्व मिळून सर्व समाजातील गावकऱ्यांना एकत्र करतात व सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन निवडणूक बिनविरोध करतात. विशेष म्हणजे अंजलीचे वडील वैजीनाथ शिरसाट हे सरपंच पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या सरपंच पदाची सूत्रे आता मुलगी अंजलीकडे सोपविली आहेत.

सुशिक्षित लोक सध्या गढूळ झालेल्या राजकारणात यायला तयार नाहीत. परंतु अंजलीने मात्र उच्च शिक्षण घेऊनही गावाच्या विकासासाठी गावाच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे.

उच्च शिक्षीत व एवढ्या कमी वयात सरपंच पदावर बिनविरोध विराजमान होणारी ही कदाचित जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांची कन्या नेहा हिची वर्ग मैत्रीण असलेल्या अंजलीचा तिचे वडील वैजिनाथ सिरसाठ यांच्यासह अंबेकर कुटुंबियांनी त्यांच्या निवासस्थानी यथोचित गौरव केला. दरम्यान, अंजलीने शहरातील जे.ई.एस. महाविद्यालयातही काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...