आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्त्वपरीक्षा:घनसावंगी तालुक्यात ग्रामपंचायत निवडण कीत दिग्गजांची सत्त्वपरीक्षा

विठ्ठल काळे | कुंभार पिंपळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यात ३४ ग्रामपंचायतीसाठी येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान होत असून आमदार राजेश टोपे, माजी आमदार विलास खरात, शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण, सतीश घाडगे या दिग्गजांच्या वर्चस्वाची सत्वपरीक्षा या निवडणुकीत होणार आहे. आता प्रचाराला वेग आला असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जात आहे.

या निवडणूकीचे वैशिष्ट म्हणजे युवकांच्या मोठया प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या घनसावंगी तालुक्यातील ९७ पैकी ३४ ग्रामपंचायतीचा निवडणुका पार पडत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षापेक्षा गटाचे अस्तित्व निर्माण करणारी ही निवडणूक लक्षवेधी ठरणार असून स्थानिक आघाडी आणि समविचारी फॉर्म्युला असा गोंडस चेहरा देऊन राजकीय सत्ता साधण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते मंडळींनी केलेला आहे.

२६ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समृद्धी पॅनल उभे करून आपलेच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी समृद्धी समूहाचे चेअरमन सतीशराव घाटगे यांनी राजकीय डावपेचाला सुरुवात करून आमदार राजेश टोपे यांच्या पॅनलला आव्हान दिले आहे. तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे १०८ तर सदस्य पदाकरता ६५५ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. अनुभवी गाव पुढाऱ्यांसमोर उच्चशिक्षित युवकांचे आव्हान उभे राहिले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. नेत्यांचे बालेकिल्लातील वर्चस्व सिद्ध करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकाकडे लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मुरलेल्या व अनुभवी गाव पुढाऱ्यांसमोर उच्चशिक्षित व नव्या दमाच्या युवकांनी आव्हान उभे केल्याने पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढवली.

१३० पोलिस कर्मचारी तैनात
निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी पोलिसांची १०० तर एसआरपीचे ३० कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथक १ अशा प्रकारे कर्मचारी तैनात केले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त देण्यात आला असून, मतदान केंद्रावर पिण्याची पाणी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध आहे.

बहुतांश ठिकाणी भाऊबंदकी
गावचा सरपंच लोकनियुक्त निवडला जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांना गावातील संपूर्ण मतदार सांभाळावे लागणार आहेत. मात्र उमेदवारांची खर्च मर्यादा हजारात प्रत्यक्ष खर्च लाखाच्या घरात आहे, तशक्यतो सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाऊबंदांनाच एकमेकांशी झुंजावे लागत आहे, त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.

बातम्या आणखी आहेत...