आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:90 टक्के अनुदानावर बचत‎ गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर‎

जालना‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाकरिता मिनी ट्रॅक्टर‎ व त्याची उपसाधने वाटप केली जाणार असून,‎ जिल्ह्यातील पात्र इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहायता‎ बचत गटांनी समाजकल्याण कार्यालयात १७ मार्चपर्यंत‎ अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याणचे‎ सहायक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.‎

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष‎ साहाय्य विभाग शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व‎ नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८‎ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के‎ अनुदानावर वाटप करण्यात येणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...