आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:हल्ल्यात वाचला, असे म्हणत‎ डोक्यात मारला रॉड, एक गंभीर‎

जालना‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाची मिरवणूक निघालेल्या डीजे समोर उभा‎ असताना त्या ठिकाणी आलेल्याने तू मागच्या चाकू‎ हल्ल्यात वाचला, असे म्हणत लोखंडी रॉड डोक्यात‎ मारला. इतरांनीही लाकडी दांड्याने, पायावर,‎ डोक्यावर मारहाण केली.

यात एक जण गंभीर जखमी‎ झाला आहे. ही घटना जालना शहरातील गणपती‎ गल्ली भागातील मंदिरासमोर रविवारी दुपारी अडीच‎ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी विलास‎ संजय बिलोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण‎ कांबळे, अभिषेक साळवे, नागेश कांबळे, आकाश‎ साळवे, सचिन लांडगे यांच्याविरुद्ध कदीम पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या‎ प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मजहर‎ सय्यद हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...