आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांच्या खिशाला कात्री:शालेय साहित्य महागले, पाचचा पेन 7 ला, तर वह्या 200 रुपये डझन; येत्या बुधवारपासून जिल्ह्यातील शैक्षणिक सत्र सुरू होणार

तीर्थपुरी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या बुधवारपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असल्याने शैक्षणिक साहित्यांनी दुकाने सजली आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यंदा साहित्य खरेदी केले जाणार असल्याने बाजारात विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या वह्या आता २०० रुपयांवर गेल्या आहे. पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळत आहे तर २०० रुपयांचे दप्तर २५० रुपयांस झाले आहे.

यंदा पहिल्या दिवसापासून नियमित पूर्णवेळ शाळा सुरू होणार आहे. वह्यांच्या किमती डझनमागे ६० ते १०० रुपयांनी वाढल्या आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या सर्वसाधारण प्रकारातील वह्या आता २०० रुपये डझनावर गेल्या आहे. दरम्यान, सन २०१९ मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य एक हजार रुपयापर्यंत मिळत होते. यंदा त्यासाठी दीड हजार रुपये मोजावे लागत आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनामुळे शाळा गेली दोन वर्षे बंद होत्या; पण काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवत शुल्क वसूल केले. शासन आदेशामुळे गेल्या वर्षी शिक्षण शुल्कात १० ते १५ टक्के सवलत देण्यात आली होती.

कागदासह वाहतूक महागल्याने दरवाढ
जगभरात कागद, शाई, स्टिलचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शालेय साहित्यावर झाला असून वह्यासह इतर कंपन्यांचे प्रिंटेड स्टेशनरी यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी महागले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य यंदा महागल्याचे तीर्थपुरी येथील शालेय साहित्य विक्रेता जुगलकिशोर चांडक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...