आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक‎ उपक्रम:विवेकानंद विद्यालयामध्ये‎ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या‎ वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न‎ करता सामाजिक बांधिलकी म्हणून‎ गजानन तौर व मित्रमंडळाने सामाजिक‎ उपक्रम राबवले. स्वामी विवेकानंद‎ विद्यालय व जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनी‎ येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात‎ आले. तसेच कारागृहातील बंदीवानांना‎ भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना‎ कारागृहाबाहेर बसण्यासाठी सिमेंट खुर्च्या‎ अर्जुन खोतकर यांच्याहस्ते बसविण्यात‎ आल्या.

यावेळी गजानन तौर, पंडीत‎ भुतेकर, अॅड. अश्फाक, मच्छींद्र ढगे,‎ शुभम टेकाळे, कल्याण भोजने,‎ काशिनाथ वाघमारे, सागर पाटील‎ आदींची उपस्थिती होती. दरम्यान,‎ सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला‎ जात असून या उपक्रमासांठी‎ मित्रमंडळाची मदत होत आहे. विविध‎ क्षेत्रातील गरजवंतासाठी आगामी‎ काळातही असे उपक्रम राबविण्यात येणार‎ असल्याचे गजानन तौर यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...