आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक नुकसान:विद्यार्थी कापूस वेचणीत गुंतल्यामुळे  ग्रामीण भागामध्ये शाळेला दांडी

जाफराबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीची सुटी संपली. शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरीही अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली आहे. ग्रामीण भागात कापूस वेचणी सुरू आहे. सद्य:स्थितीत मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी आपल्या कुटुंबासह कापूस वेचणी करीत असल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे.

यावर्षी कापसाचा हंगाम बऱ्यापैकी असल्याने पंधरा दिवसांच्या अतिवृष्टीनंतर कापूस चांगलाच फुटल्याने मजुर मिळणे कठीण झाले. परंतु विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी लागल्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मजूर मिळू लागले होते. मजुरीचे दरही सकाळी आठ वाजेपासून ते दोन वाजेपर्यत २०० ते ३०० रुपये मिळत आहेत. काही तर नऊ ते दहा रुपये किलोने वेचणीला जात आहेत.

त्यामुळे त्यांना दिवसाल ४०० ते ५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे सध्यातरी विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच दिसत आहे. कापुस वेचणीसाठी जाफराबाद, टेभुर्णी, वरुड, कोनड, शिंदी, आढा, भारज, सांजोळ, कुंभारझरी, काळेगाव यासह विदर्भातील मेरा, भरोसा, अंढेरा, टाकरखेडा, मंगरु या भागातील मजूर कापूस वेचणीसाठी अाणल्या जात आहे. अति पावसामुळे विहिरींना मुबलक पाणी आहे. नद्या नाले, लघु तलावांतही पाणी आहे. यामुळे शेतकरी कपाशीची वेचणी करून शेती तयार करून गहु, मका, सूर्यफूल, हरबरा, दादर, ज्वारी, बाजरी, पेरणी तथा लागवडीच्या तयारीत आहेत. जास्त उशीर झाला तर विहिरीचे पाणी पुरणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शेतकरी अापल्या कुटुुंबासह कापसाची वेचणी करून घेत आहेत.

थंडीच्या दिवसात पिकांना पाणी कमी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती तयार करण्यासाठी धावपळ सुरु आहे. शेती कामाचे दर चांगले मिळत असल्यामुळे व शेती कामाची धांदल मोठया प्रमाणात सुरु असल्यामुळे शिक्षक शाळेत हजर, विद्यार्थी मात्र गैरहजर असे चित्र जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन
शाळा सुरू होऊन तीन आठवडे होत आले तरी अजूनही शाळेत पाहिजे तशी विद्यार्थी संख्या नाही. अध्यापन सुरू झाले आहे. मात्र विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे शिक्षकांना अडचण येत आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, अशी मागणी विविध शाळेकडून पालकांना केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...