आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तके वाटप:13 जूनपासून शाळा सुरु होणार; सावंगी येथील विद्यार्थ्यांना वाटपासाठी मिळाली पुस्तके

सिंधी काळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळी सुट्या संपत आल्या असल्याने १३ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांना मोफत पाठ्यपूस्तक वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वर्ग नियमित सूरू झाल्यावर विद्यार्थ्याना अडचन नको यायला म्हणून प्रशासनाच्या वतीने प्रत्येक केंद्रावर पाठ्यपूस्तक वाहनातून पाठवण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती जालनाच्या वतीने जालना तालुक्यातील सावंगी तलान केंद्रापासून पुस्तके वाटपास प्रारंभ करण्यात आला.

शासकीय वाहनाच्या सहायाने प्रत्येक केंद्रावर पुस्तकाचे वाटप केली जात आहेत. गटशिक्षणाधिकारी आसावरी काळे, विस्तार अधिकारी भरत वानखेड़े, गिता नाकाडे, गट समनवयक प्रभाकर जाधव, केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड, मुख्याध्यापक संजय डोईफोडे, नारायण माहोरे, तंत्रस्नेही ज्ञानेश उचलवाड़, नशीर शेख, प्रफुल राजे, अन्वर सिद्धिकी, ज्योती स्वामी, मनीषा गायकवाड़, बाळासाहेब दास आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...