आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान दिन साजरा‎:अशोका स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा‎

मंठा‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अशोका पब्लिक‎ स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस‎ साजरा करण्यात आला.‎ यानिमित्ताने वेगवेगळ्या विज्ञान‎ प्रयोगाचे प्रदर्शन करण्यात आले.‎ त्यामध्ये साखर कारखाना ,‎ एटीएम मशीन, इको फ्रेंडली‎ साहित्य, पर्यावरणाची चिंता,‎ वाहतूक आणि नवीनता, स्मार्ट‎ सिंचन प्रणाली, स्मार्ट अलार्म‎ घड्याळ, वॉटर अलार्म प्रकल्प‎ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या‎ प्रयोगाचे प्रदर्शन शाळेत करण्यात‎ आले होते.

शाळेचे प्राचार्य विठ्ठल‎ रासे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय‎ विज्ञान दिनाविषयीची माहिती‎ दिली. विज्ञान दिन यशस्वी‎ करण्यासाठी प्रियंका चिंचणे, गीता‎ शिंदे, वंदना मोरे, सविता चव्हाण,‎ गणेश वायसे, अनंता निर्वळ,‎ कृतिका तिवारी, कांचन एखंडे,‎ राधिका जोशी, मीरा राठोड यांनी‎ सहकार्य केले. दरम्यान, प्रयोगाची‎ पालकांनीही पाहणी करुन कौतुक‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...