आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी सादर केले विविध‎ प्रयोग‎:जेमस्टोन वर्ल्ड स्कूलमध्येविज्ञानदिनीसाकारले प्रयोग ‎

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील ज्ञानज्योत शिक्षण संस्था‎ संचलित जेमस्टोन वर्ल्ड स्कूल जालना येथे‎ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायन्स उत्सव‎ व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात‎ आले होते. यात विविध प्रकारचे प्रयोग‎ सादर करण्यासह मॉडेल तयार करुन‎ विद्यार्थ्यांनी मांडले होते. यामुळे‎ विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत‎ झाली आहे.‎ शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक‎ दृष्टिकोन निर्माण व्हावा विद्यार्थ्यांमध्ये‎ सायंटिफिक टेंपरामेंट जागृत व्हावा‎ याकरिता शाळा सतत प्रयत्न करत असते.‎ शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर‎ आधारित चार्ट, मॉडेल तसेच विविध प्रयोग‎ सादर केले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून‎ बाबासिंग बायस यांची उपस्थिती होती. तर‎ प्रमुख पाहुणे म्हणून नूतन अध्यापक‎ विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत चौधरी,‎ किशोर खरात, प्राचार्य संदीप देशमुख,‎ सोनाली पांचाळ यांची उपस्थिती होती.‎ याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर‎ करीत उपस्थितांची मने जिंकली आहेत.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जेमस्टोन या शाळेत यापूर्वीही नाविन्यपूर्ण‎ उपक्रम राबविण्यात आले.‎ हे प्रयोग व मॉडेलनी वेधले लक्ष‎ विद्यार्थ्यांनी सायन्स उत्सवामध्ये‎ ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, रेन वॉटर‎ हार्वेस्टिंग कशी केल्या जाते, त्याचे फायदे,‎ मेटामार्फोसिस ऑफ बटरफ्लाय,‎ ऑक्सीजन इज इसेन्शिअल फॉर बर्निंग‎ आदींचे प्रयोग व मॉडेल लावण्यात आले‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...